School Prayer

शाळेची प्रार्थना

क्षात्र-कुल-गुरो, हे शिवराजा,
स्वीकारी ही मानस पूजा ।।
स्वातंत्र्याचे बीज सुधामय
तुझ्या मानसी रुजले निर्भय
विशाल जय हो तुझाच निश्चय
रणनेत्यांच्या पूज्य पूर्वजा ।।१।।
स्वातंत्र्याचा पहिला सैनिक
राजा नच तु, जनगण – नायक
पिढ्या पिढ्यांचा पथ निर्देशक
स्फूर्तिपथ तू सर्व वंशाचा ।।२।।
आम्ही बाळे तुझाच सारी
तव वृक्षाचे फलाधिकारी
स्वदेश रक्षक तव व्रतधारी
फडकत ठेवू तुझी जयध्वजा ।।३।।