मुलांच्या जीवनात मैदानी खेळाचे महत्व

मुलांच्या जीवनात मैदानी खेळाचे महत्व (IMPORTANCE OF OUTDOOR GAMES FOR STUDENTS)

प्रत्येक मुलांचा आवडता एक खेळ असतो. कोणाला घरात बसून खेळले जाणारे खेळ आवडतात तर कोणाला मैदानी खेळ आवडतात. कोणताही खेळ खेळताना आपले शरीर ,बुद्धी आणि मन एकाग्र होते आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. आज कालच्या 4G, 5G च्या दुनियेत इंटरनेटचे जाळे पसरले आहे, सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतात मुलांच्या जीवनामध्ये जसे अभ्यासाला महत्त्व आहे तेवढेच शारीरिक व्यायाम व खेळ यांनाही महत्त्व आहे. आजची मुले मोबाईल मुळे मैदानी खेळ खेळायचे प्रमाण कमी झाले आहे.

शिक्षणामुळे मुलांचा मानसिक विकास होतो पण मैदानी खेळांमुळे मुलांचा शारीरिक विकास होतो "स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा विकास होतो" जी मुले अभ्यासाबरोबर खेळातही भाग घेतात ती चपळ उत्साही असतात. खेळामुळे हाडे मजबूत व पचनशक्ती चांगली राहते त्यामुळे मुलांच्या जीवनात मैदानी खेळांना खूप महत्त्व आहे. आज शालेय पातळीपासून ते ऑलम्पिक स्तरापर्यंत खेळाच्या स्पर्धा होतात त्यातूनच भारताचे नाव उज्वल करणाऱ्या प्रभावी खेळाडूंचा शोध लागतो मैदानी खेळात खो-खो,कबड्डी ,फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, हॉकी, टेबल टेनिस, बास्केटबॉल, तिरंदाजी इत्यादी खेळ खेळले जातात. मैदानी खेळ खेळल्यामुळे आपल्यातील चांगल्या गुणांची वाढ होते मैदानी खेळ आपल्यामध्ये नवीन गुण आत्मसात करण्यात मदत होते, जसे खेळाडूंच्या सहकार्यामुळे एकी समजते,बुद्धीला चालना मिळते खेळातील स्पर्धेमुळे विजय आणि पराजय हे गुण आत्मसात होतात, खेळाचे नेतृत्व करण्याचे कौशल्य वाढते, संकटाशी सामना करण्याचे धाडस निर्माण होते, एकाग्रता वाढते परिणामी अभ्यासही चांगला होतो.

मुले जेव्हा मैदानी खेळ खेळतील तेव्हा घामाद्वारे अनावश्यक ग्रंथी शरीरातून बाहेर पडून शरीर नैसर्गिकरित्या शुद्ध होऊन श्वसन क्रिया वेगाने होऊन ऑक्सिजन जास्त प्रमाणात घेतला जातो आणि म्हणूनच मैदानी खेळांमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होऊन मुलांचे कौशल्य वाढते तसेच मैदानी खेळांचा आपल्या भारताच्या विकासात,भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल होण्यास मोलाचे योगदान आहे. आजच्या धकाधकीच्या युगात मैदानी खेळाचे महत्व अमूल्य आहे आणि मैदानी खेळ हे काळाची गरजही आहे व म्हणूनच आजच्या या युगात मैदानी खेळाचे महत्व विसरून चालणार नाही.

 

Anita Mundhe
Asst.Teacher